नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार पोलीस पाटलांचा मोर्चा … शासनाच्या धोरणाविरोधात संताप...
नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार पोलीस पाटलांचा मोर्चा…
शासनाच्या धोरणाविरोधात संताप ; प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी...
शासन दरबारी प्रलंबित असलेल्या राज्यातील पोलीस पाटलांच्या मागण्या दुर्लक्षित केल्याने, महाराष्ट्र राज्य गावंकामगार पोलीस पाटील संघ तसेच इतर संघटना आक्रमक झाल्या आहेत.या संघटनांच्या पुढाकारातून मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक २२ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर पोलीस पाटलांचा राज्यस्तरीय भव्य मोर्चा धडकणार आहे. या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील व राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील यांनी केले आहे.
राज्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ परिश्रम घेत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित असल्यामुळे संघटनेच्या पदाधिकारी
यांनी संपूर्ण राज्यभर दौरे करून पोलीस पाटीलांमध्ये जनजागृत्ती करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र संपूर्ण
राज्यभरातील पोलीस पाटील एकवटले असून नागपूर येथील अधिवेशनावर धडक देणार आहेत.
पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून दरमहा किमान १८ हजार मिळावे, निवृत्तीचे वय ६० वर्षा वरून ६५ करण्यात यावे, निवृत्तीनंतर किमान पाच लाख रुपये रक्कम मिळावी. ग्रामपोलीस अधिनियम १९६७मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसूल विभागातील पदभरती करतांना पोलीस पाटीलांना पाच टक्के आरक्षण द्यावे, तसेच जीवन विमा, आरोग्य विमा, प्रवासभत्ता, अशा विविध महत्वपूर्ण मागण्या घेऊन राज्यतील पोलीस पाटील नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहेत. महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याकरिता पेठ तालुक्यातील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन तालुकाध्यक्ष हिरामण भुसारे पाटील, जिल्हाउपाध्यक्ष शंकर तुंगार पाटील, तालुका सचिव मनोहर भोये पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे नियोजन केले आहे. सदर बैठकीसाठी उपाध्यक्ष मनोहर गवळी पाटील,कार्यअध्यक्ष चिंतामण पवार पाटील, संघटक वसंत बागुल, दौलत देशमुख पाटील , महिला विकास अघाडी सुनिता लहारे, हनुमंत माळगावे,
यांनी संपूर्ण राज्यभर दौरे करून पोलीस पाटीलांमध्ये जनजागृत्ती करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र संपूर्ण
राज्यभरातील पोलीस पाटील एकवटले असून नागपूर येथील अधिवेशनावर धडक देणार आहेत.
रमेश झिरवाळ, शांताराम पाडवी, कैलाश राउत, गुलाब पवार, अनिल गवळी, निवृत्ती गवळी, मोहनदास चौधरी, कमलाकर चौधरी, निवृत्ती पवार, छबिलदास आवारी, कृष्णा गावित,सह संघटनेचे सर्व पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते.
`` पोलीस पाटील पद हे गावातील महसूल आणि गृह विभागाचा महत्वाचा कणा मानला जातो.
गावातील कायदा, सुव्यवस्था, शांतता राखण्याबरोबर, प्रशासनास नैसर्गिक अपत्तीच्या काळात मदत करणे,
निवडणूक काळात मदत करणे, गोपनीय माहिती पुरविणे, राज्यातील सर्व पोलीस पाटील गेल्या अनेक वर्षापासून गावातील सर्व माहिती शासनाला पुरविणारा एक दुवा म्हणून काम करीत आहेत. असे असतांना पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार गंभीरतेने बघायला तयार नाही.
त्यामुळे आम्हाला मागण्या मंजूर करून घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याशिवाय पर्याय राहिलेला
नाही.
म.रा.गा.का.पोलीस पाटील संघ पेठ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत