बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेच्या सन 2021-22 करिता (क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील ) उर्वरित 40 टक्के निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यत...
बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेच्या सन 2021-22 करिता (क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील ) उर्वरित 40 टक्के निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता.
राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकरयाच्या उत्पनात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच
त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भादिन दि.९ ऑगष्ट २०१७ रोजीच्या शासन
निर्णयानवे आदिवाशी उपयोजना सुधारण्यात आली आहे. संदर्भादिन दि.३० डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयानवे प्रस्तुत आदिवाशी उपयोजना सुधारित करून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( क्षेत्राअंतर्गत व क्षेत्राबाहेरील) राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रु.१.५० लक्ष मर्यादे पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना,नवीन विहीर खोदणे,जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच,पिव्हीसी/एचडीपीई पाईप,शेततळ्याचे अस्तरीकरण,परस बाग, सूक्ष्म सिंचन संच,या बाबींसाठी अनुदान देण्यात येते.
सन 2021-22 करिता आदिवासी विकास विभागाने योजनेंतर्गत बिरसा मुंडा कृषीक्रांती क्षेत्राअंतर्गत उपयोजनेसाठी रू. 62.2580 /- कोटी आणि क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी रु.32.4346 /- कोटी याप्रमाणे एकूण रू.94.6926 /-कोटी निधी जिल्हा स्तरावर उपलब्ध करुन दिला आहे. याचा चांगलाच फायदा शेतकरी बांधवाना
होणार आहे.
Tulshiram Gaikwad
उत्तर द्याहटवा