Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

पशुसंवर्धन योजना.

  पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन   राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पशुसंवर्धन योजना. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नावि...

 


पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन

 

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पशुसंवर्धन योजना.

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत नाविन्यपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दि.४ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२१  पर्यंत मागविण्यात आले होते.

निवड झालेल्या पात्रता धारक लाभार्थींची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठीची सुविधा https://ah.mahabms.com/ या संकेतस्थळा वर उपलब्ध झाली आहे.

 

कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी :-  १२ जानेवारी २०२२ ते १६ जानेवारी २०२२ पर्यंत.

 

  • अमरावती व भंडारा या दोन जिल्यांसाठी कागदपत्र अपलोड करण्यास स्वतंत्र विंडो देण्यात येईल व त्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

 

०१) योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थींना शेळी / मेंढी वाटप करणे

०२)योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी.

 

०३) योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१)  फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२)  सातबारा (अनिवार्य)
३)   ८ अ उतारा (अनिवार्य)
४)   अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५)   आधारकार्ड (अनिवार्य )
६)   ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)

७)   अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८)  रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )

९)  दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य )

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत

१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

 

कागदपत्र अपलोड करण्यापुर्वी महत्वाच्या सूचना :-
1. महत्वाची सूचना कागदपत्र अपलोड क्षमता १०० के.बी. पर्यंत असावी, "jpg, JPG, jpeg, JPEG, png, PNG" या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.
2. अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील
3. अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.
4. “निवडाया बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत
5. कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या
 कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.

6. कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
7. योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.
 

महत्वाची सूचना :-

प्राथमिक निवड झालेल्या लाभार्थीपैकी (१:५) या प्रमाणात म्हणजे योजना / सवर्ग / प्रवर्ग निहाय अनुक्रमे ५  प्रतिक्षधीन लाभार्थी यांनाच फक्त कागदपत्रे अपलोड करता येतील. प्रतिक्षाधीन ५ नंतरच्या लाभर्थ्यांना कागदपत्रे सध्या ऑनलाइन पद्धतीने अपलोड करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी. अधिक माहिती करिता आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा पशुसवर्धन उप आयुक्त अथवा तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधावा.

 

कागदपत्रे कसे अपलोड करावे ?
https://ah.mahabms.com/webui/farmer-status-login  हा पोर्टल ओपन करा.
टॉप बार मध्ये कागदपत्र अपलोड करा या मेनू वर क्लिक करा.
नंतर अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड नि लॉगिन करा.
नंतर निवड या बटण वर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करा.
 

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :-https://ah.mahabms.com/


राष्ट्रीय पशुधन अभियान - योजना 
https://kalpeshinfotek.blogspot.com/2022/01/national-livestock-mission.html

                                                                                              धन्यवाद !


                                        👉 कृपया आपल्या मित्रांना शेअर करा.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत