Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

पोलीस पाटील विशेष माहिती

                                               पोलीस पाटील भरती - २०२३                                                                    ...

 

                                           पोलीस पाटील भरती - २०२३

                                            

                                                 पोलीस पाटील विशेष माहिती

 

Ø पार्श्वभूमी :-

०१) १८५७ च्या 'मुंबई सिव्हील act' या कायद्याने पोलीस पाटील हे पद निर्माण केले गेले.

०२) सरकारने १९६४ साली वंशपरंपरागत पद्धतीने अंमलात आलेली पोलीस पाटीलकी रद्द केली.

०३) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ या कायद्यानुसार पुन्हा 'पोलीस पाटील' हे पद निर्माण

      केले.

Ø नेमणूक :

उपजिल्हाधिकारी  ( प्रांतअधिकारी )

पोलीस पाटलाची नेमणूक राज्यशासन; जिल्हाधिकारी  वा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार प्रदान केले

असल्यास उपजिल्हाधिकारी (प्रांत) यांच्या मार्फत होते.

Ø पात्रता :

०१) वय : किमान २५, कमाल ४५ वर्षे

०२) शिक्षण : इयत्ता दहावी उतीर्ण असावा.

०३) शारीरिक पात्रता : शारीरिकदृष्ट्या सक्षम व वागणूक चांगली असावी.

०४) सबंधित उमेदवार त्याच गावचा रहिवाशी असावा.

Ø निलंबन :

उपजिल्हाधिकारी

Ø नियंत्रण :

पोलीस स्टेशन व तहशिलदार

Ø रजा :

०१) एका वर्षातून १५ दिवस किरकोळ रजा.

०२) रजा मंजुरीचे अधिकार तहशिलदार यांना.

०३) रजेच्या काळात शेजारचा पोलीस पाटील काम पाहतो.

Ø पोलीस पाटील कर्तव्ये (कामे)

०१) गावात बंदोबस्त राखणे.

०२) गावातील गुन्हेगारीस आळा  घालणे, गावाच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची खबर पोलीस ठाण्यास

       देणे.

३) वरिष्ठ अधिकाऱ्यांना गावातील अपराधीचे प्रमाण तसेच गावातील कायदा व सुव्यवस्था बाबतची

      माहिती व कागदपत्रे पुरविणे.

०४) सार्वजनिक शांततेला धोका पोहोचेल अशा बाबतची माहिती गोळा करून ती पोलीस   

       अधिकाऱ्यांना  देणे.

०५) गुन्हेगारांचा शोध घेण्याकरिता पोलिसांना मदत करणे तसेच गुन्ह्यांच्या चौकशीतही मदत करणे.

०६) गावात अनैसर्गिक/आकस्मित मुर्त्यू /मृतदेह सापडल्यास आवश्यक माहिती तातडीने सबंधित

       पोलीस अधिकारी व तालुका दंडाधिकारी यांना कळविणे.

०७) संसर्गजन्य रोगाची साथ सुरु झाल्यास तसा अहवाल देणे तसेच नैसर्गिक आपत्ती आल्यास

       तहसीलदारास कळविणे.

०८) गावात कोणी विनापरवाना शस्रे बाळगली असल्यास ते काढून घेणे व त्या संबंधीचा अहवाल

       सबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देणे.

०९) मादक पदार्थ बंदीच्या कायद्याच्या तरतुदीचा भंग झाल्यास तशी खबर देणे.

१०) कनिष्ठ सेवकांकडून ( कोतवाल ) आवश्यक ती कामे करवून घेणे.

११) गावात संशयास्पद व्यक्ती असल्यास त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला कळविणे.

Ø कर्तव्ये कसुरीबाबत कारवाई :

पोलीस पाटील यांनी कर्तव्यात कसूर केली असेल किंवा गैरवर्तणूक केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध

खालील प्रकारची कारवाई केली जाऊ शकते.

१) ताकीद देणे.

२) दंड ठोठावणे.

३) एक वर्षा पर्यंत निलंबित ठेवणे.

४) नोकरीतून काढून टाकणे.

५) आर्थिक नुकसानीची रक्कम वसूल करणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत