Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

नाशिक जिल्हा - विशेष माहिती

                                                नाशिक जिल्हा - विशेष माहिती   Ø एकूण लोकसंख्या - ६१,०७,१८७   Ø पुरुष : महिला प्रमाण ...

                                               नाशिक जिल्हा - विशेष माहिती

 

Ø एकूण लोकसंख्या - ६१,०७,१८७  

Ø पुरुष : महिला प्रमाण - १००० : ९३४

Ø एकूण साक्षरता - ८२ : ३१

Ø मुख्यालय - नाशिक

Ø क्षेत्रफळ : १५,५८२ चौ.कि.मी.

Ø जंगलाचे प्रमाण - ७.०१ %

Ø महसूल उपविभागची  संख्या : ९

Ø एकूण १५ तालुके : नाशिक, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, निफाड, देवळा, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, येवला,

                            मालेगाव, नांदगाव, चांदवड, कळवण, सुरगाणा, बागलाण ( सटाणा ).

Ø नद्या : गोदावरी, गिरणा, पांझरा, मोसम, दारणा, कादवा, बाणगंगा, आरम, मन्याड.

Ø प्रमुख शेती उत्पादने : गहू, ज्वारी, बाजरी, द्राक्ष, कांदा, डाळिंब, उस, भात, भुईमूग, तूर, भाजीपाला

Ø धरणे : गोदावरी नदीवर मातीचे धरण ' गंगापूर'  - दारणा नदीवर 'दारणा प्रकल्प'

          गिरणा नदीवर चणकापूर व पांझण.

Ø नाशिक शहर गोदावरी नदीकाठी वसले आहे. गोदावरी नदीचा उगम याच जिल्ह्यातील ब्रम्हगिरी

त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे.

Ø देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथांची

समाधी  आहे. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो.

Ø नाशिक जवळ गंगापूर येथे भारतातील पहिले मातीचे धरण आहे.

Ø नाशिकच्या उत्तरेस चांदवड डोंगरांच्या रांगेत दिंडोरी तालुक्यात सप्तश्रुंग पर्वतावर देवीचे मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी हे एक आहे.

Ø स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारांचे अग्रणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगावं नाशिक जिल्ह्यातील

भगूर हे होय. त्यांनी ' अभिनव भारत' हि क्रांतिकारी संघटना नाशिकलाच स्थापन केली.

Ø नाशिक जिल्ह्यातील येवला हि १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सेनापती तात्या टोपे यांची जन्म भूमी होय

Ø १९३५ साली  'मी  धर्मांतर करणार' अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम केली  ते हेच

येवला शहर होय. तसेच येवला येथील विनकरांनी विणलेले शालू, पैठण्या, पितांबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रशिद्ध आहेत.

Ø नाशिक येथे यशवंतराव चव्हाण  मुक्त विद्यापीठ व आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे.

Ø केंद्र शासनाची सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे असून तेथे चलनी नोटा, पोस्टाची तिकिटे, पाकिटे

व पोस्टकार्ड ई. छापली जातात.

Ø साल्हेर हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर नाशिक जिल्ह्यात  आहे.

Ø प्रभू रामचंद्राशी निगडीत पंचवटी व श्रीराम मंदिर, पांडव लेणी आणि दादासाहेब फाळके स्मारक

हि स्थळे नाशिकमध्ये आहेत.

Ø नाशिक जवळ ओझर येथे मिग विमानांचा कारखाना आहे. तसेच देवळाली येथे लष्करी छावणी आहे.

Ø नाशिक जिल्ह्यात इगतपुरी येथे 'विपश्यना' या बौद्ध ध्यानमार्गाचे  देशातील प्रसिद्ध असलेले

'धम्मगिरी मठ' हे केंद्र आहे.

Ø नाशिक येथे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी आहे.(मेरी)

Ø गोदावरी व कादवा या नद्यांच्या संगमाजवळ वसलेले व 'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून ओळखले जाणारे नांदूर मध्यमेश्वर नाशिक जिल्ह्यात आहे.

Ø भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती  रानडे यांचा जन्म निफाड येथे झाला.


 

Ø नाशिक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह २ मार्च १९३० ला केला.

Ø राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ३  मुंबई - आग्रा (ठाणे,नाशिक,धुळे,)

Ø राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ५० पुणे - नाशिक (पुणे,संगमनेर,सिन्नर,)

Ø औष्णिकविद्युत केंद्र - एकलहरे ( नाशिक जिल्हा)

Ø हातमाग उद्योग - मालेगाव (नाशिक जिल्हा)

Ø पितांबर व पैठण्या - येवले (नाशिक )

Ø नाशिक जिल्ह्यातील शिखरे :

१. साल्हेर : उंची - १५६७ : जिल्हा - नाशिक ( महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर)

२. सप्तशृंगी : उंची - १४१६ : जिल्हा - नाशिक ( महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर)

३. त्र्यंबकेश्वर : उंची - १३०४ : नाशिक

४. तौला : उंची - १२३१ : नाशिक

 

Ø नाशिक जिल्ह्यातील किल्ले :

घोडप, अंकाई-टंकाई, अलंग-कुलंग, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, मदनगड-बिदनगड, गाळणा. 



महत्त्वाचे मंत्री  व अधिकारी

Ø राज्यपाल

मा.श्री. रमेश बैस

Ø विधानसभा अध्यक्ष 

मा.श्री. राहुल नार्वेकर

Ø विधानसभा उपाध्यक्ष

मा. श्री. नरहरी झिरवाळ

Ø गृहमंत्री

मा.श्री. देवेंद्र फडणवीस

Ø महसूलमंत्री

मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील

Ø ग्रामविकासमंत्री

मा.श्री. गिरीष महाजन

Ø पालकमंत्री  (नाशिक )

मा.श्री. दादाजी  भुसे

Ø जिल्हाधिकारी (नाशिक)

मा.श्री. जलज शर्मा

Ø


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत